वाशिंबेत सतिश झोळने तीन एकर पेरु लागवडीतून पहील्याच वर्षी ४९ टन उत्पादन २९ लाख रुपयांची कमाई
प्रतिनिधी वाशिंबे
बदलते हवामान,वाढती मजूरी, नेहमी पडणारे पिकाचे बाजार भाव यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे जिकीरीचे झाले आहे.त्यामुळे शेतकर्यांची मुले शेती करण्यास धजावत नाहीत.हे चित्र नेहमी पहायास मिळत आहे.या सर्वांवर मात करनारे चित्र वाशिंबे परिसरात पाहण्यास मिळत आहे.करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील सतिष झोळ व लक्ष्मण झोळ या बंधूनी जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर तीन एकर तैवान पिंक पेरु लागवडीतून पहील्याच वर्षी ऐक्कोणतीस लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.वाशिंबे गाव हे उजनी लाभक्षेत्रात असल्याने या परिसरात ऊस हे मुख्य पिक घेतले जाते.परंतु वारंवार ऊसाचे एकच पिक घेतल्याने ऊत्पंन्नात होणारी घट,पिकासाठी लागणारा जास्तीचा कालावधी,खतांचा वाढलेला खर्च,गाळपासाठी होणारा त्रास त्यामुळे झोळ बंधूनी पारंपरिक पिकाला फाटा देत पेरु लागवडीचा निर्णय घेतला. तैवान पिंक या जातीच्या २६०० रोपांची तीन एकर क्षेत्रावर दोन ओळीत १० फूट व दोन रोपात पाच फूट अंतर ठेवून शेणखत व रासायनिक खत वापर करुन लागवड केली.
लागवडीपासून विक्री पर्यतं सहा लाख रुपये खर्च आला.शेताच्या बांधावरच ५० रुपये ते ७२रुपये प्रतिकिलो दराने मुंबई,पुणे येथील व्यापार्यांना मालाची विक्री केली.एकुण ऐक्कोनपन्नास टन मालाच्या विक्रीतुन ऐक्कोणतीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.रोगापासुन पेरूचे संरक्षण करण्यासाठी क्राँप कव्हर व प्लास्टिक बँगचा वापर केला त्यांमुळे गुणवत्ता व दर्जा चांगला राखण्यात यश मिळाले आहे.झोळ बंधुनी आत्तापर्यंत आपल्या शेतात केळी,कलिंगड,ऊस याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. योग्य व्यवस्थापन व कमी कालावधीत घेतलेले भरघोस उत्पन्न त्यामुळे त्यांची शेती परिसरातील शेतकर्यांना मार्गदर्शक ठरत असून आपल्या शेतात माहीतीसाठी आलेल्या शेतकर्याना आवर्जुन पिकातील बारकावे सांगत आहेत.
चौकट.
अभ्यास करुन पेरु लागवडीचा निर्णय.
कृषि मेळाव्याला उपस्थित राहून व यशस्वी पेरु बागायतदारांच्या प्लाँटला भेट देऊन त्यातील बारकावे जानुन पेरु लागवडीचा निर्णय घेतला.बाजारपेठेचा अंदाज घेत फळ छाटणी करुन बहर घेत पहील्याच वर्षी भरघोस उत्पन्न निघाले.
सतिष झोळ.
वाशिंबे ता. करमाळा.
जीवांमृत ठरले वरदान.
देशी गाईचे शेण, गोमुत्र गूळ, कडधान्याचे पिठ यांचे प्रमाणानुसार व्यवस्थित मिश्रण करून वस्त्रगाळ करुन दर आठ दिवसाला ठीबकच्या सहाय्याने झाडांना दीले.जीवांमृतामुळे जमिनीतील
सूक्ष्म जिवाणूचि संख्या,सेंद्रिय कर्ब,जमिनीतील कार्बन वाढण्यास मदत झाली.त्यामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून झाडाची योग्य वाढ,फुलांचे प्रमाण व पर्यायाने उत्पादनात वाढ झाली.
