डाॅ. स्वप्निल प्रकाश मंगवडे याचे MDS परिक्षेत घवघवीत यश
जैऊर डॉ.स्वप्निल प्रकाश मंगवडे यांच MDS परिक्षेत घवघवीत यश मिळवले.डॉ.स्वप्निल यांनी नागपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातून MDS ची पदवी संपादन केली.
ग्रामीण भागातील जेऊर येथील गावातील नावाजलेल्या भारत हायस्कूल च्या प्रायमरीत प्राथमिक शिक्षण घेवून यशाची उंची गाठण्याची जिद्द व आईवडिलांची प्रेरणा घेवून निघालेल्या डॉ. स्वप्निल यांनी पाचवी ते दहावी चे शिक्षण सुयश गुरूकूल सोलापूर येथे पुर्ण केले.दहावीत 92/गुण मिळवून ११व १२ लातूर येथे चंद्रभाणू सानवने महाविद्यालयातून पूर्ण करून वैद्यकिय क्षेत्रात प्रवेश केला.MDSच्या पात्रता परिक्षेत राज्यात २९ वा मिळवला.तर देशात ३२१ वा क्रमांक पटकावला होता.डॉ.स्वप्निल यांचे आईवडिल शिक्षक आहेत तर लहान बहिणीची वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
