गुरूनानक जयंती निम्मित आठ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर महाप्रसादाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी श्री गुरुनानकजी प्रेमी बांधव, करमाळा, यांच्या वतीने मंगळवार दि. ०८-११-२०२२ रोजी श्री गुरुनानक जयंती (कार्तिक पौर्णिमा) निमित्त दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. अध्यात्मासोबतच सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी प्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन श्री गुरुनानकजी प्रेमी बांधव, करमाळा, यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
हे दोन्ही कार्यक्रम मंगळवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत गुरुप्रसाद मंगल कार्यालय, दत्त पेठ, करमाळा, येथे होणार आहेत. महिलांसाठी महाप्रसादाची वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.तरी शहरासह परिसरातील सर्वांनी सहकुटुंब येऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गुरुनानकजी प्रेमी बांधव, करमाळा, यांच्या वतीने करण्यात आले आहे.
