दहिगाव योजना सुरळीत सुरू हे संजयमामांच्या प्रयत्नाचे फलित… मा.भरतभाऊ अवताडे. २०१९ मध्ये दहिगावचे ७३ लाख विज बिल थकीत तर २०२४ मध्ये १ कोटी ९९ लाख विज बिल आगाऊ जमा…
.
करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार संजयमामा शिंदे हे स्मार्ट व्हर्जन आहे तर आमदार नारायण पाटील हे आऊटडेटेड व्हर्जन आहे.या दोन्ही नेतृत्वातील फरक सांगताना भरत भाऊ अवताडे म्हणाले की, नारायण पाटील गटाच्या प्रवक्त्याने नाकाने वांगी सोलण्यापूर्वी दहिगाव योजनेची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडावी.२०१९-२० मध्ये ज्यावेळेस आबांकडून मामाकडे करमाळा तालुक्याचे सूत्रे आली त्यावेळेस दहिगाव उपसा सिंचन योजनेचे थकीत विज बिल ७३ लक्ष होते. या बिलामुळे योजना सुरू करणे कठीण जाणार होते. संबंधित वीज बिल आमदार संजयमामा शिंदे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाला भरायला भाग पाडून दहिगाव योजना सुरू केली. पुढे सलग ३ वर्ष साडेपाच कोटी विज बिल कृष्णा खोरे महामंडळाला भरायला लावले. व सदर बिल भरण्याची हमी विठ्ठल कार्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव या मामांच्या कारखान्याने घेतली होती .याची नोंद कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 येथे आहे तेथे जाऊन प्रवक्त्याने याचा अभ्यास करावा.४ थ्या वर्षी शेतकऱ्यांकडून वीज बिलासाठी पाणीपट्टी गोळा केली ती जवळपास ३ – साडेतीन कोटी जमा केलेली पाणीपट्टी महावितरण ला भरली.
याच दरम्यान आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ५ रुपये ७६ पैसे पर युनिट जे वीज बिल आकारले जात होतं ते १ रुपया १६ पैसे या पद्धतीने आकारले जाऊ लागले. त्याचा इफेक्ट म्हणून महावितरण कडे वीज बील भरलेले होते त्यातील जवळपास २.५० कोटी रुपयांचे वीज बिल शासनाकडे अधिकचे ऍडव्हान्स मध्ये जमा झाले.त्यामुळे ५ व्या वर्षी वीज बिलासाठी पाणीपट्टी गोळा करण्याची आवश्यकता पडली नाही. २०२४ – २५ मध्ये आबांकडे सूत्र आल्यानंतरही किमान २ वर्ष दहिगाव उपसा सिंचन योजनेचे विज बील भरण्याची आवश्यकता नाही.कारण मामांकडून आबांकडे सूत्रे जाताना नोव्हेंबर २०२४ अखेर १ कोटी ९९ लाख ही रक्कम महावितरण कडे शिल्लक आहे हे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या स्मार्ट व्हर्जनचे ठळक लक्षण आहे असे सांगतानाच अवताडे पुढे म्हणाले की,
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिकेतून देण्याची योजना आखून टेल ला पूर्ण क्षमतेने पाणी देणे व बचत होणाऱ्या पाण्यातून इतर ७ गावे समाविष्ट करणे हे स्मार्ट व्हर्जनचे काम संजयमामा शिंदे यांनी केले .
विद्यमान आमदार नारायण आबा यांनी बंदिस्त नलिकेतून पाणी देण्याच्या कामाला विरोध दर्शवत या कामामुळे पाणी पर्क्युलेशन होत नाही हे काम बंद करा असा निरोप अधिकारी ,कर्मचारी यांना दिला.एवढेच काय तर पोकलेन ड्रायव्हर यांना धमकावणे, मारहाण करणे हे काम गोरख जाधव या कार्यकत्याकडून केले आहे. पाटील यांना बंद नलीकेला विरोध करायचाच आहे तर तसे पत्र महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाला द्यावे आणि त्यांनी हवी तशी योजना मंजूर करावी. सर्व राज्यात ही योजना सुरू असताना करमाळ्यातच नारायण पाटलांचा याला विरोध हा कशासाठी आहे हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही अशी ही टीका भरत भाऊ अवताडे यांनी केली.
चौकट –
नेरले व वरकुटेला पाणी याचे स्वागतच… पण दहिगाव योजनेच्या कार्यक्षेत्रातील फिसरे,आळसुंदे,सालसे,अर्जुननगर, हिसरे ही गावे वंचित का ?
आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात दहिगावचे ६ व कुंभेजचे ४ पंप सुरळीत सुरू होते. एवढेच काय तर वर्षातील ३६५ दिवसांपैकी सरासरी २५० दिवस योजना चालवण्याचा रेकॉर्ड संजयमामांच्या नावे आहे व याची नोंद कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 येथे आहे .सध्या रब्बीचे आवर्तन खूप चांगले सुरू असून जळीत पाईपाचा विषय करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्यास चा आरोप करणारे पाटील गटाचे प्रवक्ते हे दिशाभूल करत आहेत. नेरले व वरकुटे या गावांना पाणी दिल्याचे ते सांगतात पण दहिगाव योजनेच्या लाभ क्षेत्रात असूनही फिसरे,आळसुंदे,सालसे,अर्जुननगर, हिसरे ही गावे पाण्यापासून अद्यापही वंचित का ? या प्रश्नाचे उत्तर प्रवक्ते यांनी द्यावे. या सर्व गावांना यापूर्वी संजय मामांकडून पाणी दिले गेले होते. आपण ही गावे वंचित का ठेवली ? याचा खुलासाही करावा असे अवताडे यांनी सांगितले.
