एकनाथ हिरक आरोग्यवर्षानिमित्त संगोबा येथे 26 ते 27 फेब्रुवारी दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन – महेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने राज्यात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.याचाच भाग म्हणून मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने बुधवार26 फेब्रुवारी व गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी संगोबा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात कॅन्सर पासून ते सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत करून उपचाराची सोय करून दिली जाणार असून मोफत औषधे दिली जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.या शिबिरात जवळपास 20000 रुग्णांची तपासणी करण्याची नियोजन करण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालय करमाळा ससून रुग्णालय सोलापूर,मांजरे कॅन्सर हॉस्पिटल बार्शीकॅन्सर हॉस्पिटल बार्शी,साईदीप हॉस्पिटल अहिल्या नगर सुविधा हॉस्पिटल अहिल्या नगर आनंदऋषी हॉस्पिटल अहिल्या नगर तालुका वैद्यकीय अधिकारी करमाळासह जवळपास 100 डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या वतीने सध्या करमाळ्यात शंभर रुपयात इंजेक्शन तपासणी व गोळ्या दिल्या जात आहेत.तर 250 रुपयात इंजेक्शन सलाईन व सात दिवस मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर ओंकार उघडे रुग्णांची तपासणी करणार आहेतहे शिबिर यशस्वी करण्यासाठी सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास मानेजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नवले,तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योतीराम गुंजकर,तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काटकर यांच्यामार्फत नियोजन करण्यात आले आहे.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी सरपंच हर्षली विनय ननवरेमाजी सरपंच विनय त्रिंबक ननवरे,उपसरपंच दत्तात्रय सोपान खराडे. सदस्य लालाभाई भोई,शिवाजी नगरे जिल्हा परिषद सदस्य राणीताई संतोष वारे,पंचायत समिती सदस्य एडवोकेट राहुल सावंत,बळीराम राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या शिबिराचा जास्तीत नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
