करमाळा तालुक्याबरोबर संपुर्ण सोलापुर जिल्ह्याला विकासासाठी संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वाची गरज- ॲड. अजित विघ्ने( प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस. करमाळा/ माढा)
करमाळा प्रतिनिधी २४४,करमाळा विधानसभेत जरी माजी आमदार. संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला असला तरी करमाळा तालुकाच नाही तर संपुर्ण सोलापुर जिल्हयाला माजी आमदार. संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वाची गरज असलेबाबतचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा- माढा विधानसभेचे प्रवक्ते व प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे. तसेच लवकरच माजी आमदार. संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे योग्य ती जबाबदारी आणि मानाचे स्थान देतील असे सुतोवाच केले आहे. याबाबत ॲड. अजित विघ्ने यांनी सविस्तर माहीती देताना सांगितले की, विधानसभा निवडणुकी आधीचे आणि नंतरचे चित्र वेगळे आहे. महायुतीला विधानसभेत निर्विवाद वर्चस्व मिळाले असुन, गेली पाच वर्षे महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेशी आदरणीय संजयमामांचे घनिष्ट संबध राहीलेले असुन, आजही हे संबंध अबाधित आहेत. विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून उभे रहावे ही कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्यामुळे निर्णय चुकीचा ठरला,परंतु वास्तव परिस्थिती पाहीली असता सोलापुर जिल्हयालाच आमदार संजयमामा शिंदे यांचे सारख्या सक्षम नेतृत्वाची गरज भासते असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. माजी आमदार संजयमामांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे माध्यमातुन ३५०० कोटींची विकासकामे करमाळा विधानसभा करीता मंजुर केलेली असुन, त्यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. रस्ते, वीज आणि आरोग्य व पाण्याचे महत्वाचे प्रश्न माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मार्गी लावलेले आहेत. परंतु त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधी मंडळीकंडून होत आहे. खरं तर विरोधक राजकारणासाठी कोणत्याही पातळीवर जात असुन करमाळा व माढा मतदारसंघातून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेल्या कामांवर म्हणजे आयत्या पिठावर रेघोटया मारण्याचे काम चालु झाले आहे. खरं तर कोरोनाचा काळ संपल्यानंतर माजी आमदार संजयमामांनी करमाळा तालुक्याच्या विकासाला चालना देताना बहुतांशी नाविण्यपूर्ण कामे मंजुर करून घेतली आहेत. कामे चालु व्हायला भले ऊशिर झाला असेल तरी पण ही कामे करमाळा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारी ठरणार आहेत. आज मामा विधानसभेत असते तरी करमाळा तालुक्याच्या विकासाचा दुप्पटीने वेग धरला असता. परंतु काही नेते मंडळींना विकास कामांपेक्षा स्वतःचे राजकारण आणि पदे कशी टिकतील एवढेच पडलेले आहे त्यामुळेच करमाळा तालुका विकास प्रक्रियेपासून कायम कोसो दूर जात आहे. त्यामुळे कोणी विरोधक जरी निमगाव पॅटर्न मतदारांनी नाकारल्याची चर्चा करत असले तरी अशा विचारधारेच्या राजकारण्यांची किव करावी वाटते. राजकारणात कधीच कुठला पॅटर्न नसतो कारण नेत्यांचा पॅटर्न गावावरून नाही तर कर्तुत्वावरून ठरला जातो. कोणी जेऊर पैटर्न म्हणले कोणी अकलुज पॅटर्न म्हणले तर कोणी निमगाव पॅटर्न म्हणेल ह्याला काहीच महत्व नाही .. जनसामान्यांची कामे झाली पाहीजेत व करमाळा तालुक्याचा विकास सातत्याने झाला पाहीजे यासाठी गेल्या पंचवार्षिक मधे मामांनी मंजुर केलेल्या विकास योजना ह्याच खऱ्या अर्थाने मामांचा विकास पॅटर्न आहे. ह्या विकासकामांचे श्रेय विरोधकांनी अजिबात घेऊन नये तसेच मामांनी मंजुर केलेल्या योजनांमधे सत्ताधाऱ्यांनी कमिशन पॅटर्न राबवु नये अशी अपेक्षा जनतेची राहणार आहे. खरं तर संजयमामांचे नेतृत्व हे फक्त करमाळा तालुक्यापुरते मर्यादीत नाही तर या नेतृत्वाची संपुर्ण सोलापुर जिल्हयाला गरज होती व आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापुर जिल्हयाची ही गरज ओळखुन मामांसारख्या एका उमद्या नेतृत्वाला ऊभारी देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही.. असे सुचक वक्तव्य करमाळा तालुका राष्ट्रवादी चे प्रवक्ते व संजयमामा समर्थक ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.
