करमाळाकृषीजलविषयक

कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडण्यासाठी मकाईचे चेअरमन दिग्वीजय बागल यांचे रस्ता रोको आंदोलन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मांगी तलावात कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी मांगी तलावात सोडण्यासाठी मांगी येथे दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असुन यामध्ये आंदोलनकर्त्यानी सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ रस्ता रोको आंदोलन चालू जोपर्यंत ओव्हरफ्लो चे पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडण्याच्या मागणीसाठी मांगी येथे दिग्वीजय बागल यांच्या नेतृत्वाखाली . 17 ॲागस्टला सकाळी 11 वाजताच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन झाले. यावेळी दिग्वीजय बागल यांच्यासह सुमारे 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले . करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, मांगीचे सरपंच आदेश बागल, दिनेश भांडवलकर, पोथरेचे हरिश्चंचंद्र झिंजाडे, प्रकाश पाटील शिवशंकर जगदाळे निखिल बागल, आदींचा सामावेश आहे.कुकडीचे पाणी मांगी तलावाला मिळावे यासाठी बागल यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन झाले. यावेळी वरीष्ठ आधिकारी उपस्थित नसल्याने बागल यांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत आधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरुन उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होतीदरम्यान पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन व्हानच्या माध्यमातुन ताब्यात घेऊन करमाळा येथील पोलिस ठाण्यातील क्षितीज हॉलमध्ये आणून ठेवण्यात आले होते काही कालावधीने त्यांची सुटका करण्यात आली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group