केंद्रातील भाजपासरकारच्या विरोधात करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा*
करमाळा प्रतिनिधी केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ केल्यामुळे आज करमाळा तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या दरवाढीमुळे सर्वसामान्य शेतकरी व जनता होरपळून गेली आहे. लॉकडाउन व पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे असे असतानाच केंद्र शासनाने केलेली ही दरवाढ महागाईला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने केलेली पेट्रोल, डिझेल व गॅस यांचे वर लागलेले कर कमी करून महागाईतून शेतकरी व सर्वसामान्य जनता यांना दिलासा देण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड व जिल्हा सरचिटणीस गौरव झंजुर्णे यांनी भाजपा सरकारच्या विरोधात आपले मनोगत वेक्त केले. प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अरुण काका जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, आदिनाथचे माजी संचालक तानाजी झोळ, पंचायत समिती सदश्य दत्तात्रय जाधव, मानसिंग खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, कार्याध्यक्ष महेश बोराडे, कार्याध्यक्ष मयूर पाटील, कार्याध्यक्ष बलभीम धगाते, कार्याध्यक्ष तुषार आवटे, उपाध्यक्ष तुषार शिंदे, सुरज ढेरे, सरचिटणीस रामहरी आमृळे, सोहेल मुजावर, सचिव निलेश मातेसुर, प्रदीप मिटे, शुभम बोराडे यांच्यासह अनेक युवक कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी होते.
