मांगी एमआयडीसीबद्दल मंत्रालयीन बैठकीत विकासात्मक चर्चा आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मांगी रोडलगत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यान्वित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील अडचणी सोडवणे संदर्भात उद्योग राज्यमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली असून या बैठकीमध्ये विकासात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली .
सदर बैठकीमध्ये सध्या सुरू असलेल्या रस्ते ,विज आदी मूलभूत कामे तात्काळ पूर्ण करून या उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेले पाणी मांगी तलावांमधून उचलण्याचा व ते आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला . मांगी येथील औद्योगिक क्षेत्रातील प्लॉटचे रेट अधिक असल्याकारणाने तेथे छोटे व्यावसायिक व्यवसाय सुरू करण्यासाठी धजावत नाहीत . भविष्यात मांगी एमायडिसी हे छोट्या व्यवसायिकांचे क्लस्टर व्हावे. यासंबंधी विषयावर सविस्तर चर्चा होऊन प्लॉट चे रेट कमी करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या बैठकीसाठी उद्योग राज्यमंत्री नामदार आदिती ताई तटकरे, आमदार संजय मामा शिंदे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकादम मॅडम ,सहसचिव उद्योग संजय देगावकर, अव्वल सचिव उद्योग श्री किरण जाधव तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सांगली येथील प्रादेशिक अधिकारी श्री शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.
