करमाळाकृषी

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार युरीया मिळत नसल्याने पन्नास टक्के शेतकरी युरीयापासुन वंचित असुन मागणीप्रमाणे पुरवठा करण्याची महेश चिवटे यांची मागणी                       

करमाळा प्रतिनिधी                                     युरिया टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज करमाळा शहरात महेश ऍग्रो एजन्सीमध्ये आज 910 पोत्यांची आवक झाली. प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते याप्रमाणे कृषी विकास अधिकारी कैलास मिरगणे यांच्या उपस्थितीत या खताचे वाटप करण्यात आले.खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी रांग लावली होती परंतु खरेदी करण्यासाठी आलेल्या 50 टक्के शेतकऱ्यांनाच युरिया खत मिळाल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागले यावर्षी करमाळा तालुक्यात समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस पडल्यामुळे मका तूर सूर्यफूल उडीद या पिकाची मोठ्या प्रमाणावर विक्रमी लागवड झाली आहेत आता.  या सर्व पिकांची खुरपणी झाली असून खुरपणी नंतर युरिया युरिया खताची आवश्यकता आहे .मात्र युरिया खरेदी करण्यासाठी खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर खते घेण्यासाठी बळजबरी करत आहेत 10 26 26 डीएपी मॅग्नेट या खताची बळजबरी केल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ युरिया देणे गरजेचे आहे. मागणी जास्त पुरवठा कमी यामुळे युरियाची टंचाई होत आहे रासायनिक खत उत्पादक कंपन्या सुद्धा व्यापाऱ्यांना युरिया खरेदी करण्यासाठी इतर खतांची बळजबरी करत आहेत खत विक्री. ते सुद्धा घ्यायचं या  खतांच्या बळजबरी मुळे मागविण्यास टाळाटाळ करत आहेत. आज जवळपास करमाळा तालुक्यात जवळपास दोनशे टन युरियाची आवक झाली मात्र व्यापाऱ्यांनी यासाठी शेतकऱ्यांना लिंकिंग करून शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले याबाबत बोलताना  कृषी अधिकारी कैलास मिरगणे म्हणाले की कृषी विभागातर्फे नोंदविण्यात आलेल्या मागणीप्रमाणे करमाळ्याला युरिया मिळत नाही कंपनीचे अधिकारी ठराविक तालुक्याला जास्त माल देतात करमाळ्यात आलेला युरिया सुद्धा व्यापारी दाबून ठेवतात अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करून परवाना रद्द करणार असल्याचा इशारा मिरगणे यांनी दिला आहे.                  याबाबत बोलताना कोळगाव चे माजी सरपंच तात्यासाहेब शिंदे म्हणाले की आठ दिवसापासून युरीया मिळत नाही उपलब्ध असला तरी व्यापारी नाही म्हणून सांगतात आज युरिया मिळाला याबाबत खत विक्रेते महेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मागणी प्रमाणे आम्हाला युरिया मिळत नाही. आज आलेला युरिया वाटप केले आहे. इंडियन पोटस लिमिटेड या कंपनीकडे सहा हजार पोते युरिया बुकिंग केला असून हा उपलब्ध होताच पुरवठा केला जाईल.

error: Don\'t try to copy. Content is protected !!