करमाळा तालुक्यातील केत्तुर येथील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचे मा.खा.शरद पवार यांना पत्रे

नरेंद्र ठाकूर करमाळा प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाचा विसर पडलेल्या मा.खासदार शरद पवासाहेब यांना प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी भाजपा युवा नेते मकाईचे संचालक अमोल पवार यांच्या उपस्थितीत केत्तूर नं 2 ता .करमाळा येथून#jaishreeram असे लिहून सिल्वर ओक या मुंबई येथील निवासस्थानी पत्रे पाठविण्यात आली आहेत. या वेळी भाजपा युवा मोर्चा मा. अध्यक्ष अमोल जरांडे मच्छीमार सेलचे चंद्रकांत कनीचे, सोनबा कोकणे प्रविण पवार किरण झोळ, संतोष येडे आदीजण उपस्थित होते.
