केळीपुजनाच्या निम्मिताने जमला सज्जनाचा मेळा तरुणांना अंजन घालणारे राजुकाकांचे सुंदर जीवन
केळीपुजनाच्या निम्मिताने जमला सज्जनाचा मेळा तरुणांना अंजन घालणारे राजुकाकांचे सुंदर जीवन अनुभवायला मिळाले. करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील रहिवासी संतोष उर्फ राजू काका शियाळ यांनी गुळसडी येथील आपल्या शेती फार्ममध्ये केळी पूजनाचा कार्यक्रम ठेवला होता पाच एकर केळीची बाग खडकाळ माळरानावर त्यांनी फुलवली आहे आजची तरुण पिढी म्हणते शेती परवडत नाही शेतीमध्ये काही राहिले नाही. शेती म्हणजे घाट्याचा धंदा आहे अशी युवा पिढी चर्चा करत असते परंतु आपला व्यापार उद्योग व्यवसाय सांभाळून राजू काकांनी आणि आपला व्यवसाय सांभाळूनही शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून शेती फायद्यात कशी करावी याचे प्रात्यक्षिक करमाळा तालुक्यातील तरुण वर्गाला दाखवले आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन कुठलाही वारसा नसताना केवळ जिद्द चिकाटी परिश्रम या जोरावर राजू काकांनी सुंदर जीवन कॅटल फिडस या नावाने सुरू केलेले ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या कामात त्यांची मुलं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून काम करत आहेत. आधुनिक पध्दतीने केळीची बाग लावुन सुचीत शियाळ सतिश बागल महादेव क्षीरसागर,शंकर क्षिरसागर यांनी नंदनवन उभा केले आहे. केळी पूजनाच्या निमित्ताने येथील फार्म हाऊस वर राजू काकांनी स्नेह भोजनाच्या आयोजन केले होते. या कार्यक्रमास शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी केवळ एका फोनच्या निरोप वर हजर होती हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्वांनी वनभोजनाचा आनंद घेतला नम्रता, जिव्हाळा, लोकांसाठी असलेला कळवळा व प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन माणुसकीचे नाते निर्माण करणारे राजू काका यांचे नाव संतोष आहे हे खऱ्या अर्थाने सार्थक वाटते.राजुकाकाच्या कार्याची प्रेरणा घेऊन तरुण वर्ग आकर्षित झाला असुन केळीपुजनाच्या कार्यक्रमाला गुळसडीची तरूण वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस माणुसकी विसरला आहे. आपल्या जवळच्या शेजारच्या कामापुरते बोलणारा झाला आहे. अशा परिस्थितीतही आपला उद्योग व्यवसाय सांभाळून माणसाच्या मनामध्ये माणूस तिचे नाते निर्माण करून माणसाची श्रीमंती मिळवणाऱ्या राजू काकाचे सुंदर जीवन हे खऱ्या अर्थाने सार्थक वाटते तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन उद्योग व्यवसाय बरोबरच शेती व्यवसायाकडे वळून आपले जीवन समृद्ध करावे हीच अपेक्षा.
