राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क करावी लागेल – आमदार संजयमामा शिंदे.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत सध्या गोवरने थैमान घातले असुन, गोवरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असुन, मृत्युचे प्रमाणही वाढलेले निदर्शनास आलेले आहे. गोवरमुळे लहान मुलांना धोका होत असुन, याबाबत योग्य त्या आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे वाटते. सोलापुर जिल्ह्यातही याबाबतची दक्षता आणि जागृती करावी लागेल आणि आरोग्य यंत्रणा सतर्क कराव्या लागतील, करमाळा, माढा तालुक्यासह सोलापुर जिल्ह्यात लहान मुलांसाठी गोवर लसीकरण राबवणे गरजेचे असुन याबाबत दक्षता घेणे बाबतची मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयी अधिक बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कोरोना या आजाराने असेच थैमान घातले होते .वेळीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे कोरोना अटोक्यात आणता आला. सध्या जनावरांच्या लंपी या आजाराने तालुक्यामध्ये रौद्ररूप धारण केलेले आहे. त्यामुळे एखादा आजार किंवा साथीचा रोग पसरल्यानंतर त्यावर उपाययोजना करणे च्या अगोदर तो आजार येऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात अशी अपेक्षा आहे त्यांनी व्यक्त केली.
