जनसेवा हिच खरी ईश्वरसेवा मानुन जगताप गटाने काम केले असुन स्वच्छता मोहिमेसारखे सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करावा – वैभवराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी जनसेवा हिच खरी ईश्वरसेवा मानुन जगताप गटाने काम केले असुन स्वच्छता मोहिमेसारखे सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन जगताप गटाचे युवा नेते .नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी केले. जगताप गटाचे युवक नेते मा.वैभवराजे जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करमाळा शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन या अभियानाचे उद्घाटन सोमवार, दिनांक२२ ॲागष्ट २०२२ रोजी एस.टी. स्टॅन्ड करमाळा येथे जेष्ठ पत्रकार ॲड बाबुराव हिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात पत्रकार बांधवाचा शाल हार फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या समाजव्यवस्थेत समाजकारणापेक्षा राजकारण करण्याकडे युवा पिढीचा कल असुन समाजसेवा हिच खरी ईश्वरसेवा मानुन आजपर्यत काम केले असुन महास्वच्छता मोहिम राबवुन सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्याचा स्वच्छ सुंदर करमाळा करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले आहे या कार्यक्रमास नगराध्यक्ष वैभवराजे जगताप उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, नगरसेवक श्रेणिक खाटेर ॲड नवनाथ राखुंडे चंद्रकांत शिंदे ज्योतीराम ढाणे दादा धाकतोडे नितीन कांबळे तानाजी कुकडे केतन इंदुरे सतीश फंड विकास फंड अरबाज बागवान बाळासाहेब बलदोटा अतुल देवकर गणेश कुकडे सर बळीराम दुधाट संतोष करंडे रंजीत ढाणे बाळासाहेब पाटील सर वाघमारे सर सचिन दळवी सर नजीर अहमद अस्लम वस्ताद गजू कुरेशी संदीप चुंग इजाज कुरेशी शाहरुख कुरेशी अलीम बागवान रोहिदास आलाट अक्षय आलाट सुरज इंदुरे केतन इंदुरे उपस्थित होते.
