दत्तकला’मध्ये MCA या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सुविधा केंद्रास (FC)मान्यता – प्रा.रामदास झोळ
भिगवण प्रतिनिधी स्वामी- चिंचोली (भिगवन)येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स च्या महाविद्यालयात चालू असणाऱ्या MCA या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सुविधा केंद्र (FC सेंटर) सुरू करण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET सेल) या विभागाच्या वतीने महाविद्यालयास कळविण्यास आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स हे महाविद्यालय संलग्नित आहे. हा पदव्युत्तर पदवी MCA अभ्यासक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर सुरू करण्यास केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या महाविद्यालयाचे नॅक या संस्थेने अक्रिडेशन केलेले असून या महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियंत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्युत्तर(UG &PG), एमबीए शिक्षण दिले जात आहे.या अभ्यासक्रमाचे सुविधा केंद्र देखील चालू आहे.त्याचबरोबर या वर्षी पासून एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे सुविधा केंद्र चालू करण्यास परवानगी दिली आहे.
एमसीए या अभ्याक्रमास प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी व आवश्यक माहिती साठीसंस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ व संस्थेच्या सचिव सौ.माया झोळ यांनी केले आहे.
यामधील MCA हा अभ्यासक्रम सुरू करणारे व सुविधा केंद्र असणारे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन हे परिसरातील एकमेव महाविद्यालय आहे .या पदव्युत्तर पदवी
अभ्यासक्रमाच्या सुविधा केंद्रास मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा होणार आहे दत्तकलाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे.यामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज भरणे,पसंती क्रमांक अर्ज भरणे,प्रवेश निश्चित करणे,विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणे आदी बाबीचा समावेश यामध्ये आहे.याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रा.रामदास झोळ यांनी केले आहे.
