रावगांव येथील नियोजित श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माणासाठी रक्कम रू.५११६/ देणगी द्या तिरूपती बालाजी देवदर्शनाला चला
करमाळा प्रतिनिधी रावगांव येथील नियोजित श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माणासाठी रक्कम रू.५११६/ देणगी द्या व तिरूपती बालाजी देवदर्शनासाठी तिरुपती बालाजी मंदिर (आंध्र प्रदेश) येथे चला असा अभिनव उपक्रम सुरु केला असुन या उपक्रमात सहभागी होऊन या पुण्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन लक्ष्मण बुधवंत यांनी केले आहे. मंदीराचे बांधकाम लोकवर्गणीतून पुर्ण करण्यासाठी श्री तिरुमल्ला तिरुपती बालाजी मंदिर निर्माण समिती यांच्या मार्फत हि यात्रा दर तीन महिन्यांनी मोफत देण्यात येणार असून तिरुपती बालाजी ला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मंदीर बांधकाम समिती कडून… रेल्वे रिझर्व्हेशन प्रवास, तिरुपती बालाजी मंदिर दर्शन व पद्मावती देवीचे दर्शन,मोफत देण्यात येणार आहे..तरी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील भाविक भक्तांनी संपर्क साधावा असे आवाहन नियोजित श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माण समिती चे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी ७७०९३९२२३४ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
