अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी समारंभ उत्साहात संप्पन महेश वैद्यचा पुरस्काराने सन्मान
नाशिक प्रतिनिधी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी समारंभ 21 ते 25 डिसेंबर यादरम्यान उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आले एकवीस तारखेला या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 21 ते 25 डिसेंबर या दरम्यान राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन झाले.अखिल भारतीय ब्राह्मण संस्थेच्या वतीने समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 50 लोकांचा सत्कार समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचा सांगता समारंभ शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांच्या पूजनाने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी उपाध्यक्ष रवींद्र विद्वत सचिव बाळासाहेब होशिंग कार्यवाह निलेश गंधे कार्यकारणी सदस्य शुभम कुलकर्णी हे नाशिक येथील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात ब्राम्हण समाजाचे भुषण करमाळ्याचे सुपुत्र महेश जी वैद्य यांनी फिटनेस क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
