घारगावचे सुपुत्र विशाल सरवदेच्या पंचफुला या लघुपटाची CELLULOID CALCUTTA INTERNATIONAL FLIM FESTIVAL मध्ये ऑफिशियली सिलेक्शन निवड
घारगाव प्रतिनिधी घारगावचे सुपुत्र विशाल सरवदे*त्यांच्या जिद्दीला सलाम एका हाताने व पायाने 50 टक्के अस्थिव्यंग असून देखील लहान पनापासून जे मनामध्ये बाळगले ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द…….
घारगाव येथील सुपुत्र पुणे येथे जेएसपीएम या ठिकाणी अध्यापक विद्यालय हांडेवाडी येथे शिक्षण घेत असलेले विशाल सरवदे यांनी काढलेल्या पंचफुला या लघुपटाची CELLULOID CALCUTTA INTERNATIONAL FLIM FESTIVAL मध्ये ऑफिशियली सिलेक्शन निवड झाली आहे.
पंचफुला* ही शॉर्टफिल्म तयार केली यातून समाज जागृत व्हावा व व्यसन सोडून व्यसनमुक्त व्हावा समाजामध्ये जनजागृती व्हावी तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बरबाद होत चाललेली आहे बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त होत चाललेले आहेत आपल्या कुटुंबाची काय अवस्था होते या फिल्ममध्ये पहावी या हेतूने बनवलेली आहे ही शॉर्ट फिल्म पाहून नक्कीच तरुण पिढी बाहेर पडेल व व्यसनमुक्त होईल यातून तरुण पिढीने बोध घ्यावा व व्यसनमुक्त व्हावे असे आवाहन विशाल सरवदे यांनी केले. पंचफुला फिल्म, निर्माता,कलाकार, विशेष सहकार्य करनारी टीम,पडद्यावरील व पडद्या मागे राहून सहकार्य करनारे व हे यश मिळो यासाठी आशिर्वाद व शुभेच्छा देनारी सर्व गावकरी मंडळी ….सर्वांचे अभिनंदन.
पंचफुला या लघुपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे डायरेक्टर विशाल सरवदे यांचे देखील घारगाव ग्रामपंचायत कडून व ग्रामस्थांच्या कडून अभिनंदन होत आहे.
