ग्लोबल ईन्स्टिट्युटचे प्रा. महेश निकत सर राज्यस्तरीय प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानीत.
करमाळा प्रतिनिधी
टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य आयोजित SUPER 30 राज्यस्तरीय प्रतिभा गौरव पुरस्काराने रविवारी 25 डिसेंबर रोजी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चे प्रा. महेश निकत सर यांना सन्मानीत करण्यात आले.
प्रत्येक व्यक्तीजवळ असामान्य टॅलेंट( प्रतिभा )असतं, याच टॅलेंटच्या जोरावर तो व्यक्ती जग जिंकू शकतो.
महाराष्ट्रातील कला ,क्रीडा, कृषी, शिक्षण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये असामान्य टॅलेंट असणाऱ्या, आपल्या टॅलेंट च्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या ३० व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला . त्यामध्ये प्रा.निकत सर यांचा ही समावेश होता. पुरस्कार सोहळ्यात *सन्मानचिन्ह , सन्मानपत्र ,शाल , श्रीफळ व फेटा देऊन कार्याचा गौरव करण्यात आले.हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचे प्रा. निकत सर यांनी सांगितले तसेच या पुरस्कारमुळे पुढे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रा. निकत यांनी सांगीतलेे.
