Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

स्मार्ट मुलांच्या उदंड उत्साहाने यशकल्याणी वसंत महोत्सव २०२२ संपन्न

करमाळा/प्रतिनिधी
७ ऑक्टोंबर हा महाराष्ट्राचे जेष्ठ विचारवंत व यशकल्याणी परिवाराचे संकल्पक श्रद्धेय श्री.वसंतराव दिवेकर साहेब यांचा स्मृतिदिन असतो.आजची मुले अतिशय स्मार्ट असून त्यांच्यामधील सुप्तकला गुणांचे प्रदर्शन घडावे व मनोबल वाढावे म्हणून यशकल्याणी संस्था दरवर्षी वसंत बालमहोत्सवाचे आयोजन करते.यावर्षीचा वसंत बालमहोत्सव हजारो मुलांच्या अत्यंत उत्साही सहभागाने यशस्वी झाला त्यामुळेच या उपक्रमाचा हेतू सफल झाला याचा आनंद संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व प्रोत्साहन देण्यासाठी यशकल्याणी परिवार सदैव तत्पर असतो असे सांगितले.
या महोत्सवाच्या पहिल्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्यातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ.निलेश मोटे,लीड स्कूल चे प्राचार्य अतिश क्षीरसागर,सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब ढाणे,करमाळा नगर परिषदेचे शिक्षण समन्वयक मुख्याध्यापक दयांनद चौधरी,अॅड.नवनाथ राखुंडे, रविंद्र उकिरडे, प्रा.सारिकाताई करे-पाटील आणि शितलताई करे-पाटील उपस्थित होते.तर दुस-या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एल.बी.पाटील सर,करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, सोलापूर एम.आय.डी.सी.परिक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक रोहितजी चौधरी,करमाळा नगर परिषदेचे शिक्षण समन्वयक मुख्याध्यापक दयांनद चौधरी,यशवंत परिवाराचे अध्यक्ष प्रा.जयेश पवार,प्रा.सारिकाताई करे-पाटील उपस्थित होते.
या दोन्ही सत्रातील उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन संस्थेचे कौतुक केले व पुढील आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवासाठी करमाळा तालुक्यातील विद्यार्थी,पालक व शिक्षक बहुसंख्यने उपस्थित होते.
या महोत्सवाचे सुंदर असे सूत्रसंचालन प्रा.विष्णु शिंदे सरांनी केले तर दादासाहेब पिसे आणि भिवा वाघमोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group