सोलापुर जिल्ह्यातील ५३८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर शिक्षक दिनाची शिक्षण विभागाकडून अनोखी भेट-तात्यासाहेब जाधव
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील १ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळात १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होते. कोरोना काळात कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग, पी आर सी दौरा यामुळे वारंवार ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब होत गेला. आज अखेर ५३८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती तात्यासाहेब जाधव गुरूजी यांनी दिली.
वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्याने शिक्षकांच्या वेतनात फारसा फरक पडणार नसला तरी वेतन आयोगाच्या त्रुटी दूर करण्यासाठी संघटना राज्य स्तरावर प्रयत्न करत आहे. वेतन आयोगाच्या त्रुटी दूर झाल्यास त्याचा शिक्षकांना चांगला फायदा होईल. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर केल्याबद्दल स्वाभिमानी परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम, शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री जावीर साहेब, सामान्य प्रशासन विभागाचे अनिल जगताप साहेब, सचिन साळुंखे साहेब, केंद्रे, कक्ष अधिकारी मुत्तवल्ली , रुपनर साहेब, संबंधित टेबलचे इनचार्ज बनसोडे यांचे आभार व्यक्त करण्यात आला .सोलापूर जिल्ह्यातील ५३८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर
शिक्षक दिनाची शिक्षण विभागाकडून अनोखी भेट
सोलापूर जिल्ह्यातील १ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळात १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होते. कोरोना काळात कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग, पी आर सी दौरा यामुळे वारंवार ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब होत गेला. आज अखेर ५३८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्याने शिक्षकांच्या वेतनात फारसा फरक पडणार नसला तरी वेतन आयोगाच्या त्रुटी दूर करण्यासाठी संघटना राज्य स्तरावर प्रयत्न करत आहे. वेतन आयोगाच्या त्रुटी दूर झाल्यास त्याचा शिक्षकांना चांगला फायदा होईल.
शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर केल्याबद्दल स्वाभिमानी परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम, शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री जावीर साहेब, सामान्य प्रशासन विभागाचे अनिल जगताप साहेब, सचिन साळुंखे साहेब, केंद्रे, कक्ष अधिकारी मुत्तवल्ली , रुपनर साहेब, संबंधित टेबलचे इनचार्ज बनसोडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
जिल्ह्यातील ५३८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे मनापासून आभार..! पुढील काळात वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मंजूर करण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान व्हावी, ही प्रशासनाला विनंती.
