Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

सरपंच परिषदेचे “सरपंच संवाद अभियान” उद्यापासून करमाळा येथून सुरू

करमाळा प्रतिनिधी

सरपंच परिषद, मुंबई,महाराष्ट्र चे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात *सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मा.दत्ताभाऊ काकडे व राज्य सरचिटणीस ॲड. विकास जाधव* यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख साहेब, महिला जिल्हाध्यक्ष सौ.कविताताई घोडके पाटील, जिल्हा समन्वयक सौ वनिताताई सुरवसे, पंडित ढवन, adv.धनंजय बागल,अजित बारंगुळे, पंडित मिरगणे, शिवशंकर धवन व सर्व तालुकाध्यक्ष, समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच संवाद अभियानाची सुरुवात झालेली आहे.शुक्रवार दिनांक ३०/९/२२ रोजी सकाळी 11 वाजता करमाळा पंचायत समिती सभागृहात करमाळा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. सरपंच परिषद मजबूत करण्यासाठी व ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी या दौऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहेत.
सरपंच परिषद ही कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, सर्व सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.या माध्यमातून सरपंच परिषदेची सरपंच जोडले जाणार आहेत व त्यांना स्वतःच्या गावचा विकास करण्यासाठी तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांचे हक्क अधिकार अबाधित राखण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे सरपंच संवाद अभियान अतिशय महत्त्वाचे असून *तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे व महिला तालुकाध्यक्ष सौ.मनीषा भास्कर भांगे यांनी केले.* अभियानादरम्यान सरपंच परिषदेच्या तालुका स्तरावरील काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात येणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group