किंडरजॉय सी. एस. सी. बालविद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी
श्रीदेवीचामाळ व किल्ला वेस (तालुुुुुुुुका येथील किंडरजॉय सी. एस. सी. बालविद्यालयामध्ये शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व दहीहंडी सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने आपला सहभाग दर्शविला. या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी कृष्णा, राधा, गोपिका अशी वेशभूषा परिधान करून बाळ गोपाळ यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. दहीहंडी हा वर्षातला असा एकच दिवस जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर जायला प्रमाणिकपणे मदत करतो. एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांच्या सहकार्याने व सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणारा संदेश यावेळी बालचमुंनी दहीहंडी मार्फत दिला.
यावेळी किंडरजॉय सी. एस. सी. बालविद्यालयाच्या संचालिका सौ. राजश्री कांबळे, सौ. ढाळे मॅडम, सौ. जोगदंड मॅडम, श्रीमती माने मॅडम व सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
