फिसरे जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाविना विद्यार्थ्याचे हाल विद्यार्थ्याची शिक्षणाची गैरसोय थांबवण्यासाठी शिक्षकाची नेमणुक करण्याची मागणी
फिसरे प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जिल्हा प्राथमिक शाळा फिसरे या शाळेमध्ये एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे शिक्षणाची अवस्था ना घर का ना घाट अशी अवस्था झाली असल्याने जिल्हा परिषद शाळा फिसरे येथे शिक्षकाची लवकरात लवकर नेमणुक करावी अन्यथा शाळा बंद करण्याचा इशारा येथील येथील ग्रामस्थ संतोष नेटके,गोरख नलवडे,सुनील नेटके,लक्ष्मण कणसे,किरण नेटके,नंदु खराडे,ज़्योतिराम आवताडे,बिभिषण मस्तुद,भारत मस्तुद,भुंजग पवार,औंदुबर रोकडे यांनी केले आहे.वैशाली रासकर या शिक्षिकेवर पुर्ण शाळेचा भार पडत आहे.विद्यार्थ्याचे चार वर्ग असल्याने शिक्षणाची मोठी गैरसोय झाल्याने विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांच्यात मोठा असंतोष निर्मीण झाला आहे त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनी गांभिर्याने दखल घेऊन शिक्षकांची नेमणुक करावी अशी मागणी करण्यात आली असुन मागणी पुर्ण न झाल्यास शाळा बंद करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.