आरोग्यकरमाळा

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात अस्थिव्यंग दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपासाठी मुदत वाढ- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर, करमाळा व बार्शी या ठिकाणी दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरणाचे काम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवड्या अंतर्गत विशेष मोहिमे अंतर्गत केले जात आहे.या विशेष पंधरवड्याची मुदत 2 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण होत होती .
करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अस्थिव्यंग दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरणाचे काम दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये सुरू होते.तथापि करमाळा व माढा तालुक्यातील अनेक अस्थिव्यंग दिव्यांग या प्रमाणपत्र सुविधेपासून वंचित होते अशा दिव्यांगांनी आपली व्यथा आमदार संजयमामा शिंदे यांना बोलून दाखविली . याविषयी आ. शिंदे यांनी यांनी पाठपुरावा करून सदर प्रमाणपत्र वितरणासाठी चा कालावधी करमाळा माढा तालुक्यासाठी वाढवून घेतला आहे.
दिनांक 3 , 6, 8 ,10, 12 व 15 ऑक्टोबर 2022 रोजी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अस्थिव्यंग दिव्यांगासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून करमाळा व माढा तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांना याचा फायदा होणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
करमाळा माढा मतदारसंघातील जे अस्थिव्यंग दिव्यांग आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र सुविधा घेण्याचे राहिले असतील त्यांनी आपल्या ऑनलाईन नोंदणी केलेल्या पावती व आधार कार्ड, रेशन कार्ड ,पूर्वी उपचार घेतलेली सर्व कागदपत्रे या कागदपत्रांसह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपस्थित राहून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group