करमाळा

पृथ्वी सोशल फाऊंडेशनच्यावतीने दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन-शिवनाथ घोलप

करमाळा प्रतिनिधी पृथ्वी सोशल फाऊंडेशन च्या वतीने दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष शिवनाथ घोलप यांनी दिली .
करमाळा येथील पृथ्वी सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.याम
किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली असून इयत्ता १० वी पर्यंतच्या सर्व मुले मुली यांसाठी हि स्पर्धा आहे.किल्ले बनविण्यासाठी मातीचा वापर करायचा आहे.
आकाश कंदील बनविणे स्पर्धा ही दोन गटात असून इयत्ता १ली ते ५ वी पर्यंतच्या सर्व मुले मुली तसेच इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व मुले मुली यांसाठी हि स्पर्धा आहे.आकाश कंदील बनविण्यासाठी प्लास्टिक पेपरच्या वापर करायचा नाही.
घरासमोरील रांगोळी स्पर्धा ही स्पर्धा फक्त मुली व महिलांसाठी असून दोन गटात आहे.वयोगट १३ वर्षे ते १७ वर्षे पूर्ण आणि १८ वर्षे ते खुला गट.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. स्पर्धकांनी आपले फोटो व व्हिडिओ8605782996 ,7057359671 या क्रमांकावर दिनांक 11 नोव्हेंबर पर्यंत पाठवावेत स्पर्धेतील प्रत्येक गटातील दहावीचे त्यांना आकर्षक बक्षिसे ट्रॉफी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत तसेच सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!