करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांनी कागदावरच विकास केलाआम्हाला खरा विकास हवा असून विकासाच्या मुद्द्यावर माजी आमदार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा जाहीर -माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामा शिंदे यांनी कागदावरच विकास केला असून आम्हाला खरा विकास हवा असून विकासाच्या मुद्द्यावर देशाचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार मोहिते पाटील यांच्या ‌ नेतृत्वाखाली माजी आमदार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले जयवंतराव भाऊ जगताप म्हणाले की संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल अशी मला खात्री मला वाटली होती. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन ते करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करतील परंतु आठवड्यातून एकदा करमाळ्याला हजेरी लावून आपला दरबार लावून ‌ ठराविक लोकांचे कामे करूनच धन्यता मानणारे संजयमामा यांच्या बोलण्यामध्ये व कृतीमध्ये फरक जाणवल्याने जनतेशी गोड बोलून दिशाभूल करण्याचे राजकारण न पटल्यामुळे‌ आपण यावेळी ‌ आमचे जुने राजकीय सहकारी मित्र नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिला आहे. कैलासवासी नामदेवराव जगताप यांच्यापासून पाटील घराण्याचे व जगताप घराण्याचे‌ एक राजकीय नाते असून स्वर्गीय गोविंद बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले आहे . नारायण आबा पाटील आम्ही बरोबर काम केलेले असून काही काळ आमचे मतभेद झाले असले तरी मनभेद झाले नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना आपण नेता मानत असून त्यांच्या आदेशाने व आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारायण आबा पाटील यांना आपण पाठिंबा दिला असून शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी तुतारीला करमाळा तालुक्यातून निवडून आणण्यासाठी‌ जगताप गटाचे कार्यकर्ते काम करणार आहे . जगताप गटाने कधीही जातीपातीचे राजकारण न करता ‌ काम करणाऱ्या कार्यकर्त्याला विविध पदावर काम करण्याची संधी दिली आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास ‌ हाच केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करत आहोत. त्यामुळे सर्व जातीपातींना ‌ न्याय देण्याची काम जगताप गट करत आहे. करमाळा तालुक्यामध्ये ‌ ‌‌ आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई ‌ होणार असून आमच्या जनशक्तीचा विजय निश्चित होणार असल्याचे ‌ माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले
मा .आ . जयवंतराव जगताप पत्रकार परिषद प्रमुख उपस्थिती -माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप ,माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे , माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती , माजी उपनगराध्यक्ष अहमदचाचा कुरेशी , माजी नगरसेवक श्रेणीकशेठ खाटेर , माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी , माजी नगराध्यक्ष जयराज चिवटे , माजी नगरसेवक नवनाथ राखूंडे, माजी सभापती अतुल पाटील , महेश (बंटी ) जाधव ,बाळासाहेब बलदोटा , माजी नगरसेवक डॉ . मनोज कुंभार ,माजी नगराध्यक्ष हनुमंत फंड , अमेय परदेशी , गणेश कुकडे , बाजार समिती माजी संचालक मनोज पितळे , आदिनाथ चे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे , बाजार समिती संचालक माजी देवानंद बागल , झनकशेठ परदेशी , बाजार समिती उपसभापती बबन मेहेर , बाजार समिती संचालक शिवाजी राखुंडे , बाजार समिती संचालक महादेव डुबल , बाजार समिती संचालक जनार्दन नलवडे , खरेदी विक्री संघ संचालक शहाजी शिंगटे , माजी पं स . सदस्य नागनाथ लकडे , खरेदी विक्री संघ संचालक सरपंच दादासाहेब कोकरे , माजी बाजार समिती संचालक महादेव कामटे , बाजार समिती संचालक सागर दोंड , आनंद शिंदे , खरेदी विक्री संघ संचालक संभाजी रिटे ,प्रा .तानाजी जाधव ,बाळासो कांबळे , भाऊसाहेब बुधवंत , माजी सरपंच दादासाहेब पुजारी , मनोहर गुंडगिरे ,दादा धाकतोडे , रोहीदास आलाट , शंकर माने ,सुनिल ढाणे , जोतीराम ढाणे , पै . दादा इंदलकर , बाजार समिती संचालक बाळु पवार , माजी नगरसेवक बबन पाटील , माजी नगरसेवक अजित परदेशी , उमेश सुरवडे , महादेव फुंदे , नवनाथ नागरगोजे , नंदू नलवडे, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!