करमाळा

आमदार नारायण (आबा) पाटील संभाव्य पाणी टंचाई बाबतचा आढावा घेणार, गुरुवारी करमाळा येथे अधिकारऱ्यां समवेत बैठक

करमाळा प्रतिनिधी: आमदार नारायण (आबा) पाटील यांनी मतदार संघातील संभाव्य पाणी टंचाई बाबतचा आढावा घेण्यासाठी सुचना अधिकाऱ्यांना दिल्याने करमाळा पंचायत समिती, करमाळा तहसिल विभाग व पाणी पुरवठा विभाग यांचेकडुन अहवाल तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. याबाबत करमाळा तालूक्याच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिले आहेत. यानूसार गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी करमाळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सन २०२४-२५ संभाव्य पाणी टंचाई व जलजीवन कामे आढावा बैठक’ संपन्न होणार आहे. करमाळा येथे होणारी हि बैठक सकाळी ठिक ११ वाजता सुरु होईल. या बैठकीत करमाळा तालुक्यातील गावांमध्ये असलेली नागरिकांच्या पिण्याच्या पाणीची सोय, संभाव्य पाणी टंचाई निर्माण होऊ शकणार अशा गावांसाठीची उपाययोजना, प्राप्त जलसाठ्यात असलेल्या पाण्यांची तपशीलवार माहिती घेतली जाणार आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चारा याबाबत आगामी काळात काही अडचणी निर्माण होतील का यावर चर्चा व उपाययोजना आखल्या जाणार आहेत.या बैठकीत गावच्या पाणी पुरवठ्यासाठी पुरक असलेल्या करमाळा तालुक्यातील जलजीवन योजनांच्या कामाची सद्यस्थिती व संपुर्ण आढावाही घेतला जाणार आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडी व‌ दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन मिळवून‌ दिले असुन‌ पाण्याबाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी दक्षता घेतली आहे. आमदार महोदयांनी दाखवलेल्या सतर्कते नंतर आता प्रशासनानेही वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. करमाळा तालुक्यातील उजनीकाठ वगळता इतर भागातील नागरिकांना मागील काळात पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत होते. परंतु आता हि टंचाई निर्माण होण्यापूर्वी आमदार नारायण आबा पाटील यांनी आढावा बैठक आयोजित केल्याने नागरिकांचे या बैठकीकडे लक्ष लागुन राहिले आहे. या बैठकी नंतर तपशीलवार अहवाल तयार केला जाणार आहे. संबधित विभागाकडून सदर‌अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे तर पाठवला जाणारच आहे परंतु स्वतः आमदार नारायण आबा पाटील हे समक्ष जिल्हाधिकारी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यामुळे गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी करमाळा येथील होणाऱ्या बैठकीसाठी गावोगावचे पाण्याबाबतचे अहवाल व‌ माहिती संकलनाचे काम वेगात सुरु झाले आहे. तसेच जलजीवन कामांचाही आढावा घेतला जाणार असल्याने या योजनेशी संबंधित अधिकारी व कन्सल्टन्सी यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group