भा.ज.पा तर्फे वाशिंबे येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप.

वाशिंबे प्रतिनिधी ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहाता वाशिंबे येथे भारत सरकार च्या आयुष्यमान मंत्रालयाने सुचवलेले होमिओपॅथीक आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे युवा नेते अमोल पवार,कल्याण शिंदे,अॅड_निलेश वाघमोडे, वाशिंबे ग्रामपंचायत उपसरपंच सतिश टापरे विलास झोळ उपस्थित होते, या वेळी बोलताना अमोल पवार म्हणाले की अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. या गोळ्या सकाळी अनशापोटी घ्याव्यात त्यांना हाताचा स्पर्श होऊ देऊ नये.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल यादव, जीवन झोळ,प्रविण पवार,किरण पाटील, सागर खंडागळे, माऊली वगरे यांनी परीश्रम घेतले.
