करमाळा नगरपरीषदेच्यावतीने पर्यावरणपुरक गणेशोत्सव स्पर्धा शहरातील कुटुंबाना सहभागी होण्याचे मुख्याधिकारी विणाताई पवार यांचे आवाहन.

करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये करमाळा शहरातील नागरिकांच्या सहकार्य व योगदानामुळे अनेक स्वच्छताविषयक व नवनवीन उपक्रम राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्यात 22 वा पश्चिम भारतात 29 वा तर सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे सदर स्पर्धेचे बक्षिसे लवकरच जाहीर करण्यात येणार असून या वर्षी देखील करमाळा नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सहभाग नोंदवला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत करमाळा नगर परिषद “पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा “शहरातील कुटुंबाकरिता राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत पुढील बाबींवर निरीक्षणे नोंदवून तीन क्रमांक काढले जाणार आहे.
प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम रुपये 5000/-
दुसरा क्रमांक बक्षीस रक्कम रुपये 3000/-
तिसरा क्रमांक बक्षीस रक्कम रुपये 2000/- तसेच
उत्तेजनार्थ तीन क्रमांक प्रत्येकी रक्कम रुपये 1000/-
1) पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती स्थापन केली आहे का? गुण 5
2) सजावट पर्यावरण पूरक आहे का? गुण, 5
3) निर्माल्याचे सेंद्रीय पद्धतीने खत करणेबाबत तयारी? गुण 5
4) पर्यावरण विषयक, स्वच्छता विषयक, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे का? गुण 5.
5) विसर्जन करिता पर्यावरण पूरक पद्धती अवलंबली आहे का? गुण 5.
सदर स्पर्धेकरिता विनाशुल्क व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करायची आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे परीक्षण करण्याकरिता परिक्षण पथक नेमण्यात येईल व व पाहणीची वेळ व दिनांक कळविण्यात येईल. आपण केलेल्या कृतीचे निकष निहाय – 2 फोटो व्हाट्सअप वर पाठविण्यात यावेत.
नोंदणी करण्याकरिता व्हाट्सअप नंबर
1) श्रीमती अश्विनी पाटील – 7587908395.
2) श्री समीर नदाफ – 8087832535.
3) श्री निखिल गुरसाळे- 7057458912.
नोंदणीकरिता अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2020.
तरी जास्तीत जास्त कुटुंबांनी सदर स्पर्धेत सहभागी व्हावे व स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये करमाळा शहर उत्तम क्रमांकाने निवड होण्याकरिता पर्यावरण पूरक श्री गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन मुख्याधिकारी वीणाताई पवार यांनी केले आहे.

