गणेशोत्सव प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन साध्या पद्धतीने साजरा करण्याचे नगरपरीषदेच्यावतीने मुख्याधिकारी विणाताई पवार यांचे आवाहन.

करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव 2020 च्या निमित्ताने श्री गणेशाचे सुमंगल आगमनाच्या निमित्ताने सर्व करमाळाकरांना अध्यक्ष – वैभवराजे जगताप,उपनगराध्यक्ष अहमदचाचा कुरेशी , मुख्याधिकारी – वीणा पवार व व समस्त सन्माननीय पदाधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने श्री गणेशोत्सव आपण सर्वजण साजरा करीत आहोत. दिनांक 16/08/2020 चे मा. जिल्हाधिकारी, सोलापूर श्री मिलिंद शंभरकर साहेब व मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर श्री. मनोज पाटील साहेब यांच्या द्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आपण सर्व नियमांचे पालन करणार आहोत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी व भक्तांना पुढील नियमांचे पालन करावे.
1) मास्क लावणे, सुरक्षित अंतराचे नियम पाळणे व गर्दी न करणे.
2) प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळावा.
3) पर्यावरणपूरक सजावट व मातीच्या श्री गणेश मूर्तीची स्थापना करावी.
4) श्री गणेश मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही.
5) श्री गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतो आपल्या घरी व स्थापन केलेल्या ठिकाणीच करावे.
6) श्री गणेश मूर्तीचे दान करावे सदर संकल्पना नवीन आहे मात्र मूर्ती दानाचा जास्तीत जास्त कुटुंबाने संकल्प करावा याकरिता आपल्या घराशेजारी करमाळा नगर परिषदेच्या शाळांमध्ये श्री गणेश मूर्ती दान केंद्र उभारण्यात आले आहे.
7) मातीच्या श्री गणेश मूर्तीचे घरगुती पद्धतीने विसर्जन करावे व पाण्यात विरघळून राहिलेली उर्वरित माती बागेतील झाडांना घालावे.
8) प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचे देखील अमोनिया बायकार्बोनेट खाण्याचा सोडा बेकींग सोडा यात विघटन होते तरी मूर्ती पूर्ण पाण्यात बुडवून त्यात मूर्तीच्या वजनाचे खायचा सोडा टाकावा सतत दर एक तासाधे पाणी काठीने ढवळावे चार दिवसांनी पूर्ण मूर्ती विरघळल्यावर राहिले पदार्थ कॅल्शियम कार्बोनेट आहे त्यापासून आपण घरगुती झाडां करिता कुंडी बनवू शकतो तसेच अमोनियम सल्फेट आहे ते पाणी खत युक्त असल्याने झाडांना घालावे.
9) ज्या नागरिकांना मूर्ती विसर्जित करायचे असेल त्यांना सार्वजनिक ठिकाणी येऊन विसर्जनास परवानगी नाही अशा नागरिकाला श्री गणेश मुर्ती नगरपालिका विधीवत विसर्जन करेल त्याकरिता गणेश मुर्ती स्वीकारणे केंद्र प्रत्येक आपल्या जवळील करमाळा नप शाळेत सुरू असणार आहे तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
10) कोणालाही विसर्जना करिता मूर्ती केंद्राकडे आणताना कोणतीही मिरवणूक, आरती करण्याची परवानगी असणार नाही.
तरी सर्व गणेश भक्तांनी हा श्री गणेशोत्सव आनंदात साजरा करावा नियम सणाचे पावित्र्य राखावे व आनंद द्विगुणित करावा ही विनंती करमाळा नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी विणाताई पवार यांनी केले आहे.
