वाशिंबे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निलेश खानवरे
वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ यांच्या अध्यक्षतेखाली वाशिंबे जि.प शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निलेश खानवरे उपाध्यक्षपदी अतुल राऊत यांची निवड करण्यात आली.यावेळी सरपंच झोळ यांनी सांगितले कि ज्यांची मुले-मुलीं शाळेत शिक्षण घेत आहेत. अशा पालकांची शाळा समितीत निवड करण्यात आली असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे.आपल्या मुला-मुलींना चांगले शिक्षण घेता यावे.यासाठी गावातील सर्वांनी प्रयत्न करावेत.आपली शाळेची आदर्श शाळांमध्ये निवड झाली आहे.ग्रामपंचायत माध्यमातून शाळेत विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी साठी फिल्टर,तसेच ग्रंथालयातील पुस्तके व शौचालय इतर सुविधासाठी निधी दिला आहे. असे यावेळी सरपंच मनिषा झोळ यांनी सांगितले.
