Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

विलासराव घुमरे सरांसारखा दीपस्तंभ डोळ्यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून जीवन जगणे हीच खरी आनंदी जीवनाची गुरूकिल्ली- प्रा. गणेश शिंदे सर.

करमाळा प्रतिनिधी विलासराव घुमरे सरांसारखा दीपस्तंभ डोळ्यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून जीवन जगणे हीच खरी आनंदी जीवनाची गुरूकिल्ली असल्याचे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी व्यक्त केले ज्येष्ठांच्या संस्काराचा विचाराचा वारसा जपत नाविन्याचा स्वीकार करून माणुसकीने स्वतःच्या बळावर उभे राहून आनंदी जीवन जगले पाहिजे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात यशवंत परिवाराचे आधारवड विलासराव घुमरे सर व त्यांच्या ‌ धर्मपत्नी सौ जयश्रीताई  यांचा‌ सहकुटुंब सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना ते म्हणाले की पूर्वीच्या काळामध्ये एक व्यक्ती कमवायचा व  घरातील दहा पंधरा माणसे बसून खात होती परंतु सध्याच्या या आधुनिक काळामध्ये हप्त्याच्या दृष्ट चक्रामध्ये माणूस अडकला असून मोठेपणाच्या नावाखाली जुने ते सोने हे विसरून आपले आयुष्य बरबाद करत चालला आहे.                                            आई वडील यांच्या विचाराचा वारसा जपत आपण आपल्या जीवनामध्ये नाविन्याचा शोध घेत आपले ध्येय साध्य केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मनुष्य आनंदी जीवन जगणार आहे .वास्तवतेचे भान ठेवून ज्येष्ठांचा मार्गदर्शनाखाली आपण जुन्या नावाचा वेळ घालून जीवन जगण्यास खऱ्या अर्थाने आपले जीवन सुखी संपन्न होणार आहे खोट्या प्रतिष्ठेमुळे लोकांच्या लोकांच्या अपेक्षापूर्ती स्वतःची मनशांती हरवून बसत चालला आहे .विलासराव घुमरे सर यांची जीवन आपणास बोध घेण्यासारखी असून एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊनही आणि कुटुंबाचे आधारवड बनलेले विलासराव घुमरे सर हे खऱ्या अर्थाने आपल्या युवा पिढीचे आदर्श असले पाहिजे अनेक संकटाचा सामना करून परिस्थितीचे दोन हात करून त्यांनी जीवनामध्ये सुख-समृद्धी मिळवली आहे ज्येष्ठांचा मान ठेवून नवी पिढीला मार्गदर्शकाचे त्यांचे काम असल्यानेच ते खऱ्या अर्थाने किंग मेकर मास्टर माईड आहेत. त्यांच्या विचाराचा वारसा आपण घेऊन जीवन जगण्यास खऱ्या अर्थाने निश्चित तुम्ही तुमचे ध्येय गाठणार आहात .सध्या तुमचे करिअरचे दिवस असून वास्तवतेचे भांन ठेवून आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण करियर करून आपले जीवन आनंदी करून आनंदात जीवन जगावे असे गणेश शिंदे यांनी बोलताना सांगितले. संकटेही प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा चुकली नाहीत भगवान श्रीरामाला 14 वर्षे वनवास भोगावा लागला तर श्री कृष्णा भगवानाचा जन्मच कारागृहामध्ये झाला होता. त्यामुळे देवा पेक्षा तरी आपण भाग्यवान असुन आपणास संकटे कमी आहेत. त्यामुळे संकटांना न घाबरता आपण परिस्थिती पुढे हात न टाकता खंबीरपणे उभे राहावे यश तुमचेच आहे.विलासराव घुमरे सरांच्या सतराव्या अभिष्ठचिंतन वाढिवसानिमित्त.यशवंत परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेना युवा नेते दिग्विजय बागल, आदिनाथ सहकारी साखर‌ कारखान्याचे मा.चेअरमन तात्यासाहेब मस्कर, बारामती ऍग्रोचे सुभाष गुळवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उद्योजक आशुतोष घुमरे, ॲड विक्रांत घुमरे.स्नुषा डॉक्टर सौ .रूपाली घुमरे,सौ.कोमल घुमरे नातु चि.राणा कु.रूवी,अन्विका माजी संचालक रमेश आण्णा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य एल. बी. पाटील, विक्रमसिंह सुर्यवंशी सर,उपप्राचार्य अनिल साळुंखे सर ,संभाजी किर्दाक सर ,गुलाबराव बागल  ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र दास ,सुरेश शिंदे चंद्रशेखर शिलवंत सर डॉक्टर अनिल व्हटकर बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे ,दूध संघ सचालक  ‌ राजेंद्रसिंह राजेभोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
विलासराव घुमरे सरांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत परिवाराच्या वतीने महाविद्यालयामध्ये यशवंत युवा महोत्सव, रांगोळी स्पर्धा, मिस मॅच डे, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रॅम्प वॉक, मिस वाय. सी. एम. व शेलापागोट्या असे कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणुन वृक्षारोपण करून रक्तदान वृक्षारोपण कार्यक्रम करून विलासराव घुमरे सरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण ‌ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे माजी कुलगुरू माननीय श्री अरुण अडसूळ ‌ यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमास भाजप प्रदेश उपाध्यक्षा सौ  रश्मी दीदी बागल कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर होते सदर पदवी वितरण समारंभाचा कार्यक्रम विजयश्री सभागृहामध्ये संपन्न झाला. विजयश्री सभागृहामध्येही‌‌ विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य डॉक्टर एल बी पाटील विद्या विकास मंडळाचे सर्व विश्वस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने ही विलासराव घुमरे सर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून‌ त्यांचा सत्कार केला तर  फोनद्वारे सोशल मीडिया वर्तमानपत्रे शुभेच्छा संदेश देऊन विलासराव घुमरे सर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वच गटातटातील कार्यकर्त्यांनी मान्यवरांनी विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे  मार्गदर्शक किंग मेकर मास्टर माईंड ‌असणाऱ्या विलासराव घुमरे सर यांच्या भोवती करमाळा तालुक्याच्या राजकारणाची सूत्रे एकवटली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group