जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामोणे येथे महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळा कामोणे येथे महिला हळदीकुंकू व माता व पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घघाटन जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ सर व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ .विद्या नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती राणी राऊत साळुंखे यांनी नारीशक्तीचे सक्षमीकरण करण्यासाठी नारींनीच पुढे यावे व समाजातील विधवा स्त्रियांचा अवमान बंद करावा अंधश्रद्धा नष्ट करावी. मुलामुलींना समान दर्जा द्यावा याविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेतील मीनाक्षी शिंदे काळे मॅडम यांनी मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलींचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. शाळेतील मुलींनी सुंदर अशी मुलगा मुलगी एक समान या विषयावर सुंदर नाटिका सादर केली. शेवटी विद्यार्थी शिक्षक माता संवाद साधून अडीअडचणीवर चर्चा करून मुख्याध्यापक श्री धिंगाणा गबाले सर यांनी आभार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील श्री डौले सर कुलकर्णी सर दणाणे सर राऊत सर यांनी सहकार्य केले.
