श्री जगदंबा कमलादेवी नवरात्र उत्सवाची घटस्थापना करून आनंददायी वातावरणात सुरुवात
करमाळा प्रतिनिधी श्री जगदंबा श्री कमला देवी नवरात्र उत्सवाची सुरुवात जगदंबेच्या पूजा पाठ आणि आनंदी वातावरणात झाली विश्वस्त श्री सुशील राठोड व त्यांच्या पत्नी सौ राठोड यांच्या हस्ते पुजा संप्पन झाली. आजची पूजा ओंकार पुजारी यांनी अतिशय भक्तीभावाने मांडली असून दादासाहेब पुजारी, नारायण सोरटे, विजय पुजारी,रत्नदिप पुजारी, कमलाकर सोरटे, संदीप पुजारी सर यांनी मदत केली. अध्यक्ष सोमनाथ चिवटे ,सचिव अनिल पाटील तसेच तहसीलदार तथा विश्वस्त समीर माने डाॅ. प्रदिपकुमार जाधव पाटील डॉक्टर महेंद्र नगरे उपस्थितीध्ये संप्पन झाली. महादेव भोसले अशोक गाठे यांनी मंदिराचे व्यवस्थापन केले असून पंचायत समितीतर्फे कोव्हीड कोरोना लस देण्यासाठी एक दालन उभा करण्यात आले आहे.नवरात्र उत्सवानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी अतिशय शिस्तबद्ध कडक बंदोबस्त ठेवला आहे.