सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर यांचे वडील पन्नालाल खाटेर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा दत्तपेठ येथील व्यापारी व तपस्वीरत्न पुरस्काराने सन्मानीत झालेले पन्नालाल खाटेर (वय-89) यांचे वृध्दपकाळाने आज (ता.26) सकाळी सहा वाजता राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सहा मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या 40 वर्षापासून ते सतत नामचिंतनात व्यस्त होते तसेच एक दिवसाआड जेवणे, दोन दिवसाआड जेवणे, तीन दिवसाआड जेवणे. तीन दिवस पाणी न पिता जैन धर्माचे कडक उपवास करत होते. त्यांच्या या तपाची दखल घेऊन जैन समाज संघटनेकडून त्यांना तपस्वीरत्न पुरस्काराने सन्मानीत केले होते. सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी श्रेणिकशेठ खाटेर यांचे ते वडील तर नगरसेविका संगीताताई खाटेर यांचे सासरे व ॲड.संकेत ,वर्धमान खाटेर यांचे आजोबा होते. त्यांच्यावर दुपारी दोन वाजता दिव्यरत्न गोशाळेच्या जवळच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
