ब्राम्हण संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी पत्रकार संजय कुलकर्णी यांची निवड

करमाळा (प्रतिनिधी) ब्राह्मण संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी पत्रकार संजय कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर निवडी या मा.महापौर मोहिनीताई पत्की व राम तडवळकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाअध्यक्ष श्री प्रमोद गोसावी यांनी केली आहे.
संजय कुलकर्णी यांनी या अगोदर युवक अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.व्रतबंध सोहळा (मुंज).वधुवर परिचय मेळावे,आरोग्य शिबीरे,पूरग्रस्तांना मदत, तसेच लाॕकडाऊन काळात परप्रांतियांना अल्पउपहार, चहा देणे.आदी सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.
ब्राह्यण समाजातील उद्योजकानसाठी श्री.परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांची शिष्टमंडळासह लवकरच भेट घेणार असल्याचे पत्रकार संजय कुलकर्णी यांनी सांगितले .त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक राजकीय ,क्षेत्रातून अनेकांनी अभिनंदन केले आहे .
