Thursday, February 20, 2025
Latest:
करमाळा

प्रा डॉ महेश निकत सर यांना युवा महाराष्ट्र फाऊडेशन यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त “महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025” जाहिर


करमाळा प्रतिनिधी प्रा डॉ महेश निकत सर यांना युवा महाराष्ट्र फाऊडेशन यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त “महारष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025” जाहिर झाला आहे.
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या युवा महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेमार्फत समाज, संस्कृती, यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान “महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार ” पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक प्रा डॉ महेश निकत सर यांना या पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येणारा “महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार” २०२५ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . प्रा डॉ निकत सर यांनी करमाळा सारख्या शिक्षणापासून वंचित असलेल्या तालुक्यातील शिक्षण , सामाजिक तसेच झाडे लावा झाडे जगवा , अपघात ग्रस्त लोकांना मदत करणे अश्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा “महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार” २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती युवा महाराष्ट्र फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे.हा पुरस्कार मा.हसीनी सुधीर (साऊथ अभिनेत्री), मा.विजय चौधारी साहेब (दयस्प पुणे पोलीस ) ,मा तृप्ती देसाई (संस्थापिका भूमाता ब्रिगेड) तसेच मा.मेघराज राजेभोसले (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) या मान्यवरांच्या प्रमूख उपस्थितीत दिला जाणार आहे.हा पुरस्कार साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग शिखर गाठलेल्या, पैशाला महत्त्व आलेल्या जगात जनसेवेचे व्रत घेतलेल्या व त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या व सेवेसाठी आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या सन्मान मूर्तीना विविध क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. उदात्त हेतूने निस्वार्थीपणे कार्य करणारी माणसे, दखल घेतल्या न गेलेल्या अव्याहतपणे राबणाऱ्या अदृश्य हातांना सन्मानित करून पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम पुरस्काराच्या निमित्ताने युवा महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था करणार आहे. हा या संस्थेचा या पाठीमागचा उदात्त हेतू आहे.या पुरस्काराचे स्वरूप फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, मेडल असे आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वार गुरुवार दि. 30 जानेवारी २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे या ठिकाणी पार पडणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group