Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या अभ्यासू ॲड अजित विघ्नेना विकासप्रिय नेतृत्वाला संधी द्यावी – ॲड. ऋषांत कानतोडे-पाटील


करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार पुढे येत आहेत. मात्र केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा न ठेवता सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या, अभ्यासू आणि होतकरू नेतृत्वाला या निवडणुकीत संधी मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ॲड. ऋषांत कानतोडे-पाटील यांनी केले.
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील युवक नेतृत्व म्हणून ओळख असलेले ॲड. अजित विघ्ने हे अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व आहे. त्यांनी रेल्वे, रस्ते, पूल, राष्ट्रीयकृत बँकांच्या सुविधा तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून काम केले आहे. गाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून त्यांच्या कार्याची दखल नागरिकांमध्ये घेतली जात आहे.
युवकांचे संघटन, विविध विषयांवर मार्गदर्शन, गोरगरिबांना मदत, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे तसेच विविध लोकहिताच्या आंदोलनांत ॲड. विघ्ने यांनी सक्रिय सहभाग घेत यशस्वी भूमिका बजावली आहे. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी ते सातत्याने लढा देत असून त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे.
पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या लोकशाही संस्थेमध्ये अशा कार्यक्षम आणि जनतेशी नाळ जोडलेल्या व्यक्तिमत्त्वाला संधी मिळाल्यास त्या पदाची उंची निश्चितच वाढेल, असा विश्वास ॲड. कानतोडे-पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे मतदारांनी सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या अशा नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!