भाजपच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या विद्यानगर येथील भाजप कार्यालयात संपन्न होणार – गणेश भाऊ चिवटे
करमाळा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार, 18 जानेवारी 2026 रोजी विद्यानगर येथील भाजप कार्यालयात संपन्न होणार आहेत. याबाबत आज भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गणेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांची निवड प्रक्रियेसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीस भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंगजी केदार आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल उपस्थित राहणार आहेत.
चिवटे यांनी आवाहन केले की, सर्व इच्छुक उमेदवारांनी रविवार, 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता वेळेत विद्यानगर येथील भाजप कार्यालयात उपस्थित राहावे. त्यांनी सांगितले की, मुलाखती पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार असून, निवडणूक लढविण्यासाठी सर्वोत्तम उमेदवारांची निवड केली जाईल.
यावेळी गणेश चिवटे म्हणाले, “जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीने लढणार आहे. करमाळा तालुक्यात भाजप निश्चितपणे यशस्वी होईल, याबद्दल आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे.”
भाजप तालुकास्तरावर सक्रिय राहून इच्छुक उमेदवारांना संधी देत असून, या निवडणुकीत पक्षाचे संघटन आणि रणनीती यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. करमाळा तालुक्यातील निवडणुकीचे रणांगण आता सज्ज झाले असून, राजकीय वातावरण उग्रतेने गाजत आहे.


