करमाळा शहरातील सावंतगल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव २०२२ पदाधिकाऱ्यांची निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव 2022 च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून गणेश सावळकर यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून शाहरुख मुलाणी व समाधान सुरवसे यांची निवड झाली आहे. याबरोबर मिरवणूक प्रमुख म्हणून बापू उबाळे, संघटक म्हणून आकाश जाधव, खजिनदार म्हणून योगेश काकडे, सहखजिनदार म्हणून सागर सामसे व सचिव म्हणून सुखदेव उबाळे यांची निवड झाली आहे. मिरवणूक उपप्रमुख म्हणून गोरख आगम व सहसचिव म्हणून गणेश मोरे यांची सर्वांनुमते निवड झाली आहे, अशी माहिती सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी दिली आहे.
