जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून काम करणारे प्रदीप शेठ बलदोटा यांचे कार्य प्रेरणादायी- पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब
करमाळा प्रतिनिधी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून काम करणारे प्रदीपशेठ बलदोटा यांचे कार्य प्रेरणादायी असे मत करमाळयाचे पोलीस निरीक्षक रीक्षक विनोद घुगेसाहेब यांनी व्यक्त केले.प्रदीप शेठ बलदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होती पुढे बोलताना ते म्हणाले की मनुष्य जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत माणसाने आपले जीवन जगताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजाचे रूम फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे पैसा सर्वांकडे असतो परंतु त्या पैशाचा विनीयोग समाजासाठी करणारा माणूसच खऱ्या अर्थाने कर्मयोगी असतो त्यामुळे कर्तुत्व दातृत्व याचा अनोखा संगम असलेले प्रदीपशेठ बलदोटा भारतीय जैन संघटनेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष असुन सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. प्रदीप शेठ बलदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपूर्णा योजनेमार्फत निराधार ज्येष्ठ अबाल वृध्द लोकांना अन्नदान करण्यात आले.
याचबरोबर मानवता हाच खरा गरजू लोकांना किराणा माल देण्याचे काम दरवर्षी करत आहे.कोरोना काळातही अनेक गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप त्यांनी केले असून धर्म कार्य करताना कुठल्याही प्रसिद्धीन न घेता सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे प्रदीप शेठ बलदोटा यांनी आपल्या कामामुळे समाजाचा मोठा विश्वास संपादन केला आहे.सर्व समाजाला बरोबर घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणारे प्रदीप शेठ बलदोटा यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला असून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मंडळींनी सोशल मीडिया फोनद्वारे त्यांना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेठ बलदोटा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.
