करमाळा

किरण साळींच्या नेतृत्वाखाली युवा सेना जिल्ह्यात मजबूत करणार -प्रियदर्शन साठे

करमाळा प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न सोडून प्रत्येक कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे काम शिवसेनेचा शाखाप्रमुख करत असतो हेच काम प्रत्येक नवीन शाखाप्रमुखाने करून करमाळा तालुक्यात शिवसेना मजबूत करावी व शिवसेना सचिव किरण साळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात संघटनेची बांधणी करावी असे आव्हान युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठी यांनी केले.        करमाळा येथे आज युवा सेनेचा करमाळा तालुका मेळावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील 51 गावांच्या शाखाप्रमुख पदी विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्यायावेळी तालुकाध्यक्ष नवनाथ गुंड यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले.यावेळी बोलताना प्रियदर्शन साठे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे याचा फायदा घेऊन आता सत्तेचा राजकारणाचा वापरही शिवसैनिकांनी केला पाहिजे.सचिव किरण साळी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील युवा सैनिकांचा भव्य मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले की युवा सेनेने विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सारख्या योजना घरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील उपस्थित होते.यावेळी खालील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पदे देण्यात आली१) बापूसाहेब जाधव उपतालुका प्रमुख २) शहाजी बोराडे उपतालुका प्रमुख ३) माधव सूर्यवंशी ता सचिव ४) गणेश निमगिरे ता संघटक ५) विजय गुळवे सहसंघटक ६) विनोद अभंग सहसचिव ७) विठ्ठल भोगील समन्वयक ८) शंकर लोंढे जि.प.गट केम उपाध्यक्ष९) विक्रम हार्गे जि.प.गट वांगी उपाध्यक्ष१०) नितीन साबळे जि.प.गट वीट उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group