मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण देण्यासाठी करमाळा शंभर टक्के बंद यशस्वी
करमाळा प्रतिनिधी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण देण्यासाठी करमाळा शंभर टक्के बंद यशस्वीपणे पाळण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण मिळावे सगेसोयरेची अमलबजावणी करावी याकरीता अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. त्याच्या समर्थनार्थ करमाळ्यात रविवार दिनांक २२ संप्टेबर रोजी करमाळयात सकल मराठा समाजाच्यावतीने बंद पुकारण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करत समाज बांधवानी करमाळ्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाईक रॅलीने जात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान करमाळ्यातील मुख्य मार्गाने बाईक रॅली काढत समाजची एकजूट दाखवण्यात आली.घोषणांनी परिसर दणाणला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १० वाजता मराठा समाज बांधव एकत्र आले
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जय महाराष्ट्र चौक मार्गे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गायकवाड चौकातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय करमाळा येथे निवेदन देण्यात आले. त्यानंतर किल्ला विभाग येथून लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वेताळ पेठेतून महाराणा पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून तेली गल्लीतून पोथरे नाका येथे जात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर
महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर पोथरे नाका ते एसटी स्टँड ऊ छत्रपती चौक येथून श्री कमलाभवानी देवीच्या रस्त्याने जात रिलायन्स पेट्रोल पंप व तेथून बायपासने जामखेड चौक, नगर रोड मार्गे मेन रोडने सुभाष चौकात रॅली आली. तेथून राशीन पेठला ही रॅली गेली. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला.करमाळ्यात सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला मुस्लिम समाजासह इतर काही समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. या बंदला राजकीय नेते मंडळींनी व काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठींबा दिला आहे. या बंदमध्ये अनेकजण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दुकाने बंद ठेवून दुकानदारांनीही पाठींबा देऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून करमाळा शहर व तालुका बंदची हाक देण्यात आली होती. या करमाळा बंद मध्ये सकल मुस्लिम समाजाच्या असंख्य मुस्लिम बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली व मोटर सायकल रॅलीत सहभाग नोंदवून व पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.मराठा संघर्षयोध्दा मनोजजरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण द्यावे सगेसोयरेची अमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.सकल मराठा समाज बांधव बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
