करमाळा

करमाळा नगरपरिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नागरिकांनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे -मुख्याधिकारी सचिन तपसे*

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नागरिकांनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. करमाळा नगरपरिषद प्रभाग संख्या दहा असून प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार आरक्षणानुसार निवडणुकीत सामोरे जाणार आहेत करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्ग मधून असून करमाळा नगर परिषदेसाठी एकूण 22 हजार 116 मतदान असून स्त्री मतदार110066 पुरुष मतदान 110 48 इतर दोन अशा पद्धतीने एकूण मतदान असून नगराध्यक्ष पदासाठी साडेसात लाख रुपये खर्चाची मर्यादा असून नगरसेवक पदासाठी अडीच लाख रुपये खर्च मर्यादा आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी महसूल तहसीलदार दिनेश पारगे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर हे काम पाहणार असून सहायक निवडणूक अधिकारी म्हणून आपण काम करणार असल्याचे त्यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी सांगितले आहे 
 करमाळा नगरपरिषद सदस्य पात्रता म्हणून  उम्मेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असून तो करमाळा शहरातील रहिवासी असावा व त्याचे मतदार यादीमध्ये नाव असावे.सुचक संख्या पाच असून पक्षाने उमेदवारी दिल्यास एक सुचक असणे गरजेचे आहे.
 उमेदवारीसाठी – १अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवार रु.१०००/-राखीव उमेदवार:- रु.५००/- (जातीचा दाखला असणे आवश्यक) महिला उमेदवार रु.५००/- नामनिर्देशन कालावधी दि.१०/११/२०२५ ते दि.१७/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते दु.३.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टी वगळता) असुन नामनिर्देशन पत्र श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर, किल्ला विभाग, करमाळा येथे स्वीकारले जाणार आहे .
छाननी दि.१८/११/२०२५ (श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर, किल्ला विभाग, करमाळा येथे होणार आहे
नामनिर्देशन मागे घेण्याची :-अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि.२१/११/२०२५ पर्यंत. अपील असेल तेथे दि.२५/११/२०२५ पर्यंत चिन्ह वाटप दिनांक दि.२६/११/२०२५मतदान दि.०२/१२/२०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वा. होणार आहे मतमोजणी दिनांक दि.०३/१२/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. पासून मतमोजणी पार पडणार असून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह. येथे होणार आहे.
या निवडणुकीसाठी नागरिकांनी दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे तसेच डिजिटल मीडिया व प्रिंट माध्यमातील पत्रकारांनी दिलेल्या आचारसंहितेनुसार वृत्तांकन करावे असे आवाहन  करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी केले या पत्रकार परिषदेला कार्यालय अधीक्षक स्वप्नील बाळेकर,आकाश वाघमारे,नगर अभियंता,शशांक भोसले सहा.नगर रचनाकार हिंदुराव जगताप,सहा.लेखापालसोमनाथ सरवदे,अंत.लेखापरीक्षक विपूल पुजारी,स्वच्छता निरीक्षक लिपीक पीयूष शिंपी कर्मचारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!