करमाळा

हिवरेचे मा.सरपंच बापूराव फरतडे यांचा बागल गटात जाहीर प्रवेश… बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद. बागल गटात प्रवेश सत्र सुरू

करमाळा प्रतिनिधी 
हिवरे येथील मा.सरपंच बापूराव फरतडे,निमगाव ह. येथील युवा उद्योजक नागनाथ भोसले नारायण पाटील गटातून तर विठ्ठल रोकडे यांनी संजय शिंदे गटातून मकाईचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत निमगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर प्रवेश केला.मकाईचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला गावपातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.युवा नेते दिग्विजय बागल सर्व मतभेत विसरुन करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दुरावलेल्या सर्व सहकार्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत सोबत घेणार असल्याचा निर्धार या मेळाव्याप्रसंगी करत आहेत.
यापूर्वी वीट येथील मेळाव्यात पोंधवडी गावचे युवा नेते अमोल गाडे यांनी तर सालसे येथील तानाजी लोकरे यांनी केतूर येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.तसेच सोगाव ग्रा.पंचायत मा.सरपंच कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक कैलास पाखरे यांनी वाशिंबे येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.तर शेटफळ येथील मेळाव्यात रामवाडीचे मा.सरपंच संतोष वारगड,जिंतीचे अंकुश महाराज खराडे, सिकंदर शेख यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी भाजप नेते दिग्विजय बागल,कृषि उत्पन्न बाजार समिती मा.उपसभापती चिंतामणी जगताप,रामवाडीचे मा.सरपंच रयत क्रांती संघटनेचे संतोष वारगड,सतीष नीळ औदूंबरराजे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर,उपसभापती चिंतामणी जगताप,नवनाथ बागल,सतिश नीळ,अजित झांजूर्ने, गणेश झोळ,रेवन्नाथ निकत,अशिष गायकवाड,राजेंद्र मोहोळकर गणेश तळेकर , पै.अनिल शिंदे, महेश तळेकर,विलास काटे,डॉ.विजय रोकडे,युवराज रोकडे,अँड.सोनवणे,अँड.जयदीप देवकर,सचिन पिसाळ,स्वप्निल गोडगे,युवराज मगर, अशोक पाटील अशोक हणपुडे, शकील तांबोळी, तात्या फरतडे, रवी शेळके, राजेंद्र जगताप भारत जगताप, विठ्ठल रोकडे,संजय रोकडे, जगन्नाथ ननवरे, अजिनाथ जगताप, शिवाजी भुई, शिवाजी बरडे, उत्रेश्र्वर जगदाळे, महादेव रोकडे, जोतीराम घाडगे,
यांच्यासह या परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आश्राब जगदाळे हे होते शेवटी उपस्थित मान्यवरांचे रणजित शिंदे यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group