करमाळा

करमाळा बाजार समितीस राज्यातील बाजार समित्यांमधून उत्कृष्ट कार्य करणारी बाजार समिती म्हणून “स्व. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाजार समितीचा पुरस्कार करमाळा बाजार समितीस  राज्यातील बाजार समित्यांमधून उत्कृष्ट कार्य करणारी बाजार समिती म्हणून “स्व. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार “करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीस समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला .महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने उपक्रम, कामकाज,गुणवत्ता, सुविधा वआर्थिक निकषांच्या आधारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाजार समितीला प्रतिवर्षी पुरस्कार प्रदान केला जातो .सन २०२४-२५ मधे या सर्व निकषास माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील करमाळा बाजार समिती पात्र ठरल्यामुळे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीला उत्कृष्ट कार्य करणारी बाजार समितीचा पुरस्कार समारंभपूर्वक राज्य बाजार समिती संघाच्या पुणे येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रदान करण्यात आला . बाजार समितीच्या वतीने बाजार समितीचे संचालक तथा जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप व सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी पुरस्कार स्वीकारला .कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती प्रवीणकुमार नाहाटा ,उपसभापती संतोष सोमवंशी, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, माजी आमदार केशवराव मानकर, अकलूज मार्केट कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी यांचे सह बाजार समिती संघाचे संचालक व राज्यभरातील बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते .
 *करमाळा बाजार समितीस उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाजार समितीचा” स्व . वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार “स्वीकारताना जगताप गटाचे युवा नेते तथा बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप ,सचिव विठ्ठल क्षीरसागर .*

error: Don\'t try to copy. Content is protected !!