राजुरी.ता. करमाळा येथील नविन रस्ता व पुलाच्या कामामुळे नागरिकांची होणारी अडचणीची शर्यत संपली
राजुरी प्रतिनिधी राजुरी.ता- करमाळा येथील नविन रस्ता व पुलाच्या कामामुळे नागरिकांची होणारी अडचणीची शर्यत संपली आहे. आमदार. संजयमामा शिंदे यांनी राजुरीकर ग्रामस्थांचे मागणीवरून मौजे.राजुरी गावापासुन सावडी- करमाळा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील महत्वाचा *पुल(ब्रीज)* तातडीने मंजुर करून आज वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे… वास्तविकतः या पुलाची तेथे आत्यंतिक गरज भासत होती.. कारण या ठिकाणी असणारा ओढा आणि रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे व तेथे असणारा प्रचंड चढ.. यामुळे तेथे वाहनांना जाणे जिकरीचे होते.. तेथे असणारी वाशिंबे, केत्तुर, गोयेगाव, सोगाव, उंदरगाव, मांजरगाव, पारेवाडी कडील ग्रामस्थांना सावडी, राशिन, कोर्टी, करमाळा कडे जाताना तसेच मकाई, अबालिका आणि बारामती ॲग्रो कारखान्याला जाण्याऱ्या ऊसाची वाहतुक करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता… येथुन एसटी महामंडळाच्या बस ला देखिल जायला यायला अडथळे निर्माण होत होते… आज *आमदार. संजयमामा शिंदे यांचे सहकार्यातुन राजुरकरांच्या मागणीला यश आले आहे.
राजुरीकरांना या पुलाचे कामाबरोबरच इतर अनेक रस्त्यांची कामे देखील मंजुर केलेली असुन, कामे प्रगतिपथावर आहेत.. लवकरच राजुरी येथे एमएसईबी चे सबस्टेशन देखिल होणार असुन या भागातील विजेचा महत्वाचा प्रश्न मिटणार आहे… आज सर्वत्र प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होत असुनही राजुरीच्या या महत्वाच्या झालेल्या पुलामुळे नागरिकांची होणारी अडचणींची शर्यत संपली आहे.मामासाहेब.. तमाम राजुरीकरांतर्फे व भागातील ग्रामस्थांकडुन आभार मानले.
