करमाळा

आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भव्य रॅलीचे आयोजन

करमाळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात माजी प्राचार्य नागेश माने यांच्या शुभहस्ते झेंडावंदन संपन्न झाले. आजादी का अमृतमहोत्सवा वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीचा शुभारंभ करमाळ्याचे तहसीलदार समीर माने , संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , संस्थेचे खजिनदार गुलाबराव बागल , करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत , करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी , उपप्राचार्य , कॅप्टन संभाजी किर्दाक , माजी प्राचार्य नागेश माने , नायब तहसीलदार सुभाष बदे , निवासी नायबतहसीलदार विजयकुमार जाधव साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन होऊन वरील मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले. सदर रॅली महाविद्यालयापासून दत्त मंदिर सुभाष चौक , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , शालीमार चौक , आंबेडकर चौक , घोलपनगरमधून महाविद्यालयात रॅलीचा सांगता समारंभ संपन्न झाला. या रॅली मध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराज , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले . सदर रॅली दोन किमी पेक्षा अधिक लांबीच्या दोन रांगा होत्या . सदर रॅलीत 1730 विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीत एन.सी.सी. व एन.एस.एस. व इतर विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन शहर दणाणून सोडले. या रॅलीत एन. एस. एस.चे ढोल पथक , वासुदेव , महात्मा गांधी , भारत माता व इतर पारंपारिक वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. या भव्य रॅलीचे संपूर्ण करमाळा शहरवासी यांचे डोळ्याचे पारणे फेडले . महाविद्यातील सर्व विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचे अभिवचन दिले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. मुक्ता काटवटे यांनी केले तर आभार प्रा. सौ. सुजाता भोरे यांनी मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group