करमाळा काॅंग्रेस ॲाय पक्षाच्यावतीने आझादी गौरव पदयात्रा संप्पन
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस आय करमाळा शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी(दादा) जगताप, मा.नगरसेवक राहुल (भैय्या) जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेचे नियोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम स्व.देशभक्त नामदेवरावजी जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन सदर रॕलीचा प्रारंभ झाला.त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार घालुन सदर रॕली फुलसौंदर चौक मार्गे जय महाराष्ट्र चौक , सुभाष चौक, पंजाब वस्ताद चौक मार्गे स्व.आण्णासाहेब जगताप पुतळ्यास पुष्पहार घालुन रॕलीचा समारोप करण्यात आला.तद्नंतर नामरत्न काॕम्प्लेक्स मध्ये बैठक संपन्न् झाली यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप म्हणाले कि देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष पुर्ण होत आहेत याचा माझ्या बरोबरच संपुर्ण देशभराला अभिमान आहे.वास्तविक पहाता देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासुन काँग्रेस पक्षाने बलिदान दिले आहे.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,यांचा वारसा काँग्रेस पक्षाला लाभलेलाअसुन इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी,यांच्यासारखे महान व्यक्तीमत्व पक्षाला लाभले.आज त्यांच्याच विचारावर काँग्रेस पक्ष चालत असुन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आ.प्रणितीताई शिंदे,जिल्हाध्यक्ष डाॕ. धवलसिंह मोहीते पाटील यांच्या सारख्या खंबीर,लढवय्या नेत्याच्या सुचने नुसारच आजच्या पदयात्रेचे नियोजन केले आहे.या पदयात्रेस दस्तगीर पठाण, साहील सय्यद, दादा पवार,समाधान काळे, दादा कुदळे,यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
